ज्ञानेश्वरीचे लेखन पहिल्याने “मनोगत” या संकेतस्थळाकरता झाले होते. आता ती तिथे नाही. कुठेतरी वाचकांना उपलब्ध असावी म्हणून स्वतःच्या ब्लॉगवर ठेवतो आहे. मूळ लेखन सोनोपंत दांडेकरांच्या प्रतीवरून झाले आहे. जालावरच्या किंवा इतर कुठल्याही प्रतीची नक्कल नाही. मूळ लेखनात श्री. सतिश खेडकर व सौ. क्षिप्रा यांची बहुमोल मदत झाली होती तसेच “मनोगत” प्रशासकांचेही पाठबळ होते. आता रोज थोड्या थोड्या ओव्या कठीण शब्दांच्या अर्थासह लिहीत जाईन.
it very important